दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) दिली. विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

आर्थर यांच्या नियुक्तीबाबत पीसीबीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला आणि आर्थर यंनीही होकार कळवला. आर्थर यांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्ज संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.