News Flash

ना सुरक्षा ना स्वातंत्र्य; जाणून घ्या काय म्हणाला माजी क्रिकेटपटू पाकिस्तानबद्दल

त्या क्रिकेटपटूने आपल्याला आलेले अनुभव शेअर केले आहेत.

पाकिस्तान या ना त्या कारणांनी कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी भारताने कलम जम्मू काश्मीरमधील ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान बिथरल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच अनेक ठिकाणी मदत मागूनही पाकिस्तानच्या बाजूने कोणताही देश उभा रहायला तयार नाही. त्यातच आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फलंदाज प्रशिक्षक ग्रँट फ्लावर याने पाकिस्तानातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. पाकिस्तानमध्ये हवे तितके स्वातंत्र्य नाही. तसंच त्या ठिकाणी सुरक्षेच्याही समस्या आहेत, असं मत त्यानं व्यक्त केलं आहे.

पाकिस्तानमधील अशा अनेक समस्या त्या देशापासून लांब जाण्यास आपल्याला प्रवृत्त करतात, असेही ग्रँट फ्लावर यावेळी म्हणाला. झिम्बाब्वेच्या माजी क्रिकेटपटू ग्रँट फ्लावरने २०१४ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदाची धुरा आपल्या हाती घेतली होती. परंतु गेल्याच आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचं काँट्रॅक्ट न वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने पाकिस्तान संघाबरोबर काम करताना आलेले अनुभव शेअर केले आहेत. यावेळी त्याला पाकिस्तानातील सर्वात फ्रस्ट्रेट करणारी गोष्ट कोणती असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने यावर उत्तर देताना पाकिस्तानातील सुरक्षा आणि स्वातंत्र्याची कमी हे सर्वात जास्त फ्रस्ट्रेट करणाऱ्या गोष्टी होत्या असं तो म्हणाला. २००९ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर फार कमी संघांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. दरम्यान, या मुलाखतीदरम्यान अशी कोणती गोष्ट आहे, ज्याची आठवणही काढावीशी वाटत नाही, असा सवाल त्याला यावेळी करण्यात आला. त्यावर उत्तर देताना माजी खेळाडूंचं मागून बोलणं आणि टिव्ही चॅनलच्यामागून केलं जाणारं राजकारणं हे आपल्याला आवडत नसल्याचं त्यानं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 11:31 am

Web Title: pakistan cricket team batting coach grant flower shares his experience jud 87
Next Stories
1 प्रशिक्षक निवडीत कोहलीच्या पसंतीचा प्रश्नच नव्हता!
2 भारत-वेस्ट इंडिज सराव सामना : ‘कसोटी’पूर्वी लय मिळवण्याचे लक्ष!
3 श्रीलंका-न्यूझीलंड कसोटी मालिका : वॉटलिंगच्या अर्धशतकाने न्यूझीलंडला सावरले
Just Now!
X