पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चांगलाच फॉर्ममध्ये आहे. बाबरचा आत्मविश्वास खेळपट्टीवर वावरताना स्पष्ट दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० सामन्यातही त्याने वादळी खेळी करत शतक ठोकलं. तर वनडेत चांगली कामगिरी केल्याने विराट कोहलीला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. या गौरवानंतर बाबर आझमने आता नवं लक्ष्य समोर ठेवलं आहे. आता कसोटी सामन्यात नंबर एकवर पोहोचण्याचा त्याचा मानस आहे.

“झहीर अबाबस, जावेद मियांदाद आणि मोहम्मद यूसुफ यांच्या श्रेणीत जाण्याचा मानस आहे. माझ्या कारकिर्दीत हा मैलाचा दगड ठरणार आहे. आता मला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. अधिक वेळ अव्वल राहण्याचा प्रयत्न आहे. जसं विवियन रिचर्ड्स १९८४ ते १९८८ या कालावधीत अव्वल होते. तर विराट कोहलीही १२५८ दिवस पहिल्या स्थानावर होता.”, असं बाबर आझमने सांगितलं.

विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; सचिन-कपिल देव यांचाही सन्मान

“यापूर्वी मी आयसीसी टी २० सामन्यांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचलोय. आता कसोटीत नंबर एकवर पोहोचण्याचा मानस आहे. एका क्रिकेटपटूसाठी ही मोठी कसोटी आहे. मला हे लक्ष्य काही करून गाठायचं आहे. त्याचबरोबर बलाढ्य संघासमोर अधिक धावा करायच्या आहेत.”, असंही बाबरने पुढे सांगितलं.

Video: चिडलेल्या कोहलीने बॅटने उडवली खुर्ची, IPL च्या आचारसंहितेचा भंग; मॅच रेफ्रींनी फटकारलं

आयसीसीने नुकतीच वनडे क्रमवारी जाहीर केली. त्यात बाबर ८६५ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. ८५७ गुणांसह विराट दूसऱ्या, तर ८२५ गुणांसह रोहित तिसऱ्या स्थानावर आहे.