03 August 2020

News Flash

पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली झाला भारताचा जावई

भारतीय महिलेशी लग्न करणारा हसन हा पाकिस्तानचा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली मंगळवारी शामियासोबत विवाह बंधनात अडकला आहे. शोयब मलिकनंतर हसनही भारताचा जावाई झाला आहे. हरियाणाच्या नूंह भागात राहणारी शामिया आरझू सध्या एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनीअर म्हणून काम करते.

२० ऑगस्ट मंगळवारी राजी दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये हसन अली आणि शामिया आरझू यांचा विवाहसोहळा पार पडला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला.

शामिया आणि हसन अलीचे लग्न शामियाच्या पंजोबांनी ठरवले. गेल्यावर्षी दोघांची भेट झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले होते. हसन अलीने पाकिस्तानकडून नऊ कसोटी सामन्यात ३१ बळी मिळवले आहेत. तर ५३ एकदिवसीय सामन्यात ८२ बळी घेतले आहेत.

भारतीय महिलेशी लग्न करणारा हसन हा पाकिस्तानचा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी जहीर अब्बास, मोहसिन खान आणि शोएब मलिक यांनी भारतीय मुलींशी लग्न केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 10:19 am

Web Title: pakistan cricketer hassan ali marriage shamia arzoo in dubai nck 90
Next Stories
1 टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विराटला ‘या’ गोष्टीचं टेन्शन
2 अजिंक्य रहाणे की रोहित शर्मा?
3 कोहलीला धोनीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी
Just Now!
X