पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याप्रकरणी फलंदाज नासिर जमशेदवर दहा वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज या शिक्षेची सुनावणी केली आहे. पाक क्रिकेट बोर्डाने स्थापन केलेल्या चौकशी समितीत नासिर जमशेद दोषी आढळला होता, यानंतर समितीने दिलेल्या निकालानुसार जमशेदला शिक्षा सुनावण्यात आली आहे. नासिर पुढची १० वर्ष पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळू शकणार नाहीये, याचसोबत आयुष्यभरासाठी नासिर पाकिस्तान क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं पद भूषवु शकणार नाहीये.