पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि प्रतिभावंत फलंदाज सलीम मलिक याने त्याच्यावरील क्रिकेटबंदी उठवण्याची मागणी केली आहे. १९९५ च्या ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्यात मार्क वॉ, शेन वॉर्न आणि टीम मे या खेळाडूंनी खराब कामगिरी करावी म्हणून सलीम मलिकने त्यांना पैसे देऊ केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा प्रकार २००० साली स्पष्ट झाला. २००० साली सलीम मलिक याच्यावरील आरोप सिद्ध झाले आणि त्यामुळे त्याच्यावर क्रिकेटबंदी घालण्यात आली. २००८ साली पाकिस्तानमधील न्यायव्यवस्थेने त्याच्यावरील बंदी उठवली, पण क्रिकेट बोर्डाने मात्र त्याला पुनरागमनाची संधी दिली नाही. पण आता वयाच्या ५७ व्या वर्षी क्रिकेट संघात नाही तर नाही, पण किमान प्रशिक्षण देण्याची तरी मुभा मिळण्यासाठी बंदी उठवण्याची मागणी सलीम मलिक करत आहे.

प्रेक्षक नसले तरी IPL खेळशील? रोहितने दिलं ‘हे’ उत्तर

एका सोशल मीडियाच्या लाईव्ह चॅट मध्ये बोलताना सलीम मलिक म्हणाला की मला पाकिस्तानसाठी चांगली कामगिरी करून दाखवायची आहे. मी वाईट कारणासाठी लोकांच्या लक्षात राहण्यापेक्षा मला दुसरी संधी मिळाली तर मी देशाची सेवा करेन. मला माझ्या देशातील क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्याची तरी मुभा देण्यात यावी.

गांगुली ओरडून ओरडून सांगत होता, पण कैफने ऐकलंच नाही… वाचा ‘तो’ किस्सा

सलीम मलिक

मालिकेच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूंना पुन्हा संघात घेतले. मोहम्मद आमिर, सलमान बट, मोहम्मद असिफ आणि शरजिल खान यांना संघात पुन्हा स्थान मिळाले. मग माझ्या बाबतीतच असा दुजाभाव का केला जातो आहे? असा सवाल मलिकने पाक क्रिकेट बोर्डाला केला.

“…तर घाबरायचं कशाला?”; हरभजनचा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराला सवाल

मी २०१२ मध्ये पाकिस्तान संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकासाठी अर्ज भरला होता. २००८ साली पाकच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी देखील अर्ज भरला होता, पण दोन्ही वेळा माझ्या अर्जाला केराची टोपली दाखवण्यात आली. किमान आता तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माझ्यावरीन क्रिकेटबंदीचा फेरविचार करावा आणि बंदी उठवावी, अशी मागणी त्याने केली.