31 May 2020

News Flash

पाकच्या स्टार खेळाडूला धक्का.. PCB ने केली निलंबनाची कारवाई

त्याने पाकिस्तानकडून १०० हून अधिक वन-डे सामने खेळले आहेत.

चुकीच्या इंग्रजी वाक्यामुळे विनोदाचा विषय ठरलेला पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल याला आणखी एक धक्का बसला आहे. उमर अकमल याला गुरूवारी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने निलंबित केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासादरम्यान त्याच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आला.

‘पाकिस्तान क्रिकेट मंडळ आज उमर अकमल याला तत्काल प्रभावाने निलंबित करत आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असणाऱ्या तपासादरम्यान त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता तो क्रिकेटशी संबंधित कोणत्याही गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नाही’, असे PCB ने जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. ‘सध्या या प्रकरणातील चौकशी आणि तपास सुरू असल्यामुळे याबाबत आणखी काही भाष्य करणे उचित नाही’, असेही या पत्रकात म्हटले आहे.

उमर अकमल

PCB कडून अकमलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, पण अकमलने नियमावलीतील नक्की कोणत्या नियमाचा भंग केला आहे याबाबत मात्र मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. अकमल हा पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत क्वेट्टा ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळत होता. मात्र त्याला आता त्या स्पर्धेत देखील खेळता येणार नाही. त्याच्या जागी बदली खेळाडूचा अर्ज करण्याची संमती पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून संघ व्यवस्थापनाला देण्यात आले आहे.

उमर अकमल हा पाकिस्तानकडून ऑक्टोबर महिन्यात शेवटचा सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत १६ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ८४ टी २० सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 12:48 pm

Web Title: pakistan cricketer umar akmal suspended by pakistan cricket board amid anti corruption probe vjb 91
Next Stories
1 रोहित शर्मा पाहतोय ‘या’ गोष्टीची वाट
2 हे आहेत जगातील सर्वोत्तम ४ क्रिकेटपटू!
3 ICC Women’s T20 World Cup 2020 : अंतिम फेरीची कोंडी फुटणार का?
Just Now!
X