पाकिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिकने आपल्या संघामध्ये 2019 चा विश्वचषक जिंकण्याची क्षमता असल्याचं म्हटलं आहे. मात्र एखादी मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्हाला क्षमतेसोबत तितका चांगला खेळही करावा लागतो. सध्याच्या पाकिस्तानी संघात अव्वल दर्जाचे गोलंदाज आणि फलंदाज आहेत, त्यामुळे आमच्या संघाला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी असल्याचं शोएब म्हणाला. तो Sky Sports वाहिनीशी बोलत होता.
पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या वन-डे सामन्यात मात केली आहे. 2017 साली इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला हरवत विजेतेपद पटकावण्याचा मोठा अनुभव पाकिस्तानी संघाच्या गाठीशी आहे. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ वरचढ ठकण्याची शक्यता आहे. यावेळी बोलत असताना शोएब मलिकने आपल्या निवृत्तीविषयी थेट वक्तव्य करणं टाळलं. मात्र 2020 साली होणाऱ्या टी-20 विश्वचषकात आपण खेळणार नसल्याचंही मलिकने स्पष्ट केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 9:24 am