21 October 2020

News Flash

…तर मी स्मिथच्या तोंडावर बॉल फेकून मारला असता – अख्तर

"स्टीव्ह स्मिथला रोखण्यासाठी मी त्याला दुखापतग्रस्तही करेन"

ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ क्रिकेट जगतातील सध्याच्या क्रिकेटपटूंपैकी महत्त्वाचा खेळाडू आहे. फार कमी कालावधीत त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये तर सध्या तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. मात्र अशा प्रतिभावान खेळाडूबाबत पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने एक विधान केले आहे. माझ्या वेळी जर स्मिथ असता तर मी किमान ३ ते ४ वेळा त्याच्या तोंडावर चेंडू फेकून मारला असता, असे शोएब अख्तरने एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

स्टीव्ह स्मिथ

शोएब अख्तरने यु-ट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केला. त्यात शोएब अख्तरने म्हटले की स्टीव्ह स्मिथची फलंदाजी पाहून मी अवाक झालो. त्याची फलंदाजी तांत्रिकदृष्ट्या फारशी चांगली नाही, पण त्याच्या फलंदाजीत धाडस आहे. तो खेळताना धाडसी वृत्तीने गोलंदाजावर अधिराज्य गाजवतो. त्यामुळेच तो मैदानात अत्यंत परिणामकारक ठरतो. तो गोलंदाजावर चाल करून जातो आणि त्या गोलंदाजाला चांगलाच चोप देतो. तो सगळं कसं करतो ते मला माहिती नाही. पण तो जर माझ्या काळात फलंदाजीला उतरला असता, तर मी नक्कीच त्याला रोखण्यासाठी त्याच्या तोंडावर गोलंदाजी करताना ३ ते ४ वेळा चेंडू फेकून मारला असता.

शोएब अख्तर

स्टीव्ह स्मिथ हा खूप धाडसी आणि जिद्दी फलंदाज आहे. त्यामुळे मी त्याला रोखण्यासाठी त्याला जायबंदी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता. त्याला दुखापतग्रस्त करण्याच्या उद्देशाने मी त्याच्या तोंडावर चेंडू फेकून मारला असता. पण तो सध्या ज्या फॉर्ममध्ये खेळतो आहे, त्यावरून त्याला जायबंदी करणंही कठीण किंवा अशक्य आहे असे वाटते आहे. तो खूप चांगली फलंदाजी करतो आहे. त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा!, असेही शोएब अख्तर म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 3:39 pm

Web Title: pakistan in australia would have hit steve smith to stop him from scoring shoaib akhtar vjb 91
Next Stories
1 Video : जेव्हा रोहित शर्मा पत्रकारांना सांगतो; बॉस फोन सायलेंटवर ठेवा !
2 शिखर धवनला बसवून राहुलला टी-२० मध्ये सलामीला संधी द्या !
3 मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘गब्बर’ खेळाडूच्या पंगतीत मिळवलं स्थान
Just Now!
X