एकदिवसीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी घसरण झाल्याने पाकिस्तानचा संघ २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेसाठीची पात्रता गमावून बसण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱयात पाकिस्तानच्या संघाला पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-४ असा सपाटून मार खावा लागला. त्यामुळे पाकिस्तानची जागतिक क्रमवारीत ८६ गुणांसह नवव्या स्थानावर घसरण झाली. क्रमवारीतील पहिले आठ संघ हे विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरविण्यात येतात. सध्या आठव्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजकडे ९४ गुण आहेत, तर पाकिस्तानकडे ८६ गुण आहेत. त्यामुळे ही आठ गुणांची तफावत भरुन काढणे आगामी काळात पाकिस्तानसाठी खूप कठीण असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानने क्रमवारीतील आपले स्थान उंचावले नाही, तर त्यांच्यावर पात्रता फेरीत खेळण्याची नामुष्की ओढावू शकते. विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविण्यासाठी पाकिस्तान संघाला ३० सप्टेंबर २०१७ पर्यंतचा कालावधी आहे. या कालावधीत पाक संघाला आपली कामगिरी उंचावून पहिल्या आठ संघामध्ये स्थान मिळवावे लागणार आहे. पहिले आठ संघ हे थेट पात्र ठरतील, तर उर्वरित दोन संघ हे पात्रता स्पर्धेतून आगेकूच करतील. पात्रता स्पर्धेत एकूण १० संघ असतात. पाकिस्तानने आपले स्थान उंचावले नाही, तर या १० संघांमध्ये पाकिस्तानचाही समावेश होईल. मग पाकिस्तानला आपली पात्रता सिद्ध करण्याची नामुष्की ओढावू शकते.
सध्याच्या जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया १२४ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर भारतीय संघ ११० गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. न्यूझीलंडचा संघ ११३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा