News Flash

डेल स्टेनच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा ४९ धावांत खुर्दा

जोहान्सबर्ग कसोटीत डेल स्टेनच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची अक्षरक्ष: भंबेरी उडाली आणि त्यांचा पहिला डाव अवघ्या ४९ धावांतच संपुष्टात आला. काही दिवसांपूर्वीच कसोटीत ३००व्या बळीची

| February 3, 2013 02:15 am

जोहान्सबर्ग कसोटीत डेल स्टेनच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची अक्षरक्ष: भंबेरी उडाली आणि त्यांचा पहिला डाव अवघ्या ४९ धावांतच संपुष्टात आला. काही दिवसांपूर्वीच कसोटीत ३००व्या बळीची नोंद करणाऱ्या डेल स्टेनचे ८.१ षटकांत ६ निर्धाव षटके टाकत आठ धावांत सहा बळी हे पृथक्करण पाकिस्तानची भंबेरी स्पष्ट करणारे होते. पाकिस्तानची कसोटी क्रिकेटमधील ही नीचांकी धावसंख्या ठरली आहे. व्हरनॉन फिलँडर आणि जॅक कॅलिसने प्रत्येकी २ बळी घेत स्टेनला चांगली साथ दिली. पाकिस्तानच्या केवळ दोन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. पहिल्या डावात २०४ धावांची मोठी आघाडी घेऊनही आफ्रिकेने पाकिस्तानला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ३ बाद २०७ अशी मजल मारली आहे. आफ्रिकेकडे एकूण ४११ धावांची आघाडी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 2:15 am

Web Title: pakistan only 49 in front of hard balling by del stain
टॅग : Sports
Next Stories
1 न्यूझीलंडविरुद्ध चांगल्या कामगिरीची पाकिस्तानला आशा
2 क्लार्क, पाँटिंग ठरणार आकर्षण
3 उत्तर प्रदेश विझार्ड्स उपांत्य फेरीत दाखल
Just Now!
X