News Flash

‘‘तुला विराट आणि रोहितचा फोन आला तर कोणाचा कॉल उचलशील?”

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाजनं दिलं 'हे' उत्तर

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाज अलीकडच्या काळात त्याच्या गोलंदाजीत चमक दाखवू शकलेला नाही. गेली १३ वर्षे वहाब पाकिस्तान क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळत आहे, पण कामगिरीच्या अभावामुळे तो संघात आत-बाहेर होत राहिला. अलीकडेच वहाबची एक मुलाखत प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत वहाबने मोकळेपणाने उत्तरे दिली. वहाबने विराट कोहली, रोहित शर्मा आणि एबी डिव्हिलियर्ससारख्या दिग्गज फलंदाजांविषयी आपले मत शेअर केले.

क्रिकेटपटूंनंतर आता फुटबॉलपटूची करोना लढ्यात उडी, गोलकीपरने केला आपल्या जर्सीचा लिलाव

या मुलाखतीत वहाबला एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला. ‘‘तुला विराट कोहली आणि रोहित शर्माचा फोन आला तर कोणाचा कॉल उचलशील?”, असे वहाबला विचारण्यात आले. तेव्हा त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीचे नाव घेतले. याशिवाय त्याने आपला आवडता अभिनेता सलमान खान असल्याचे सांगितले आहे. वसीम अक्रम हा क्रिकेटमधील त्याचा आदर्श आहे.

विराट-रोहितपेक्षा डिव्हिलियर्सला गोलंदाजी करणे अवघड – रियाज

क्रिकेट पाकिस्तानने यूट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये वहाब रियाझने कबूल केले, विराट-रोहितपेक्षा डिव्हिलियर्ससमोर गोलंदाजी करणे खूप अवघड आहे. याशिवाय पीएसएल आणि आयपीएलची तुलना करता येणार नाही. आयपीएलची पातळी खूप मोठी आहे, असेही वहाबने कबूल केले आहे.

२०११च्या एकदिवसीय विश्वचषकात मोहाली येथील भारताविरुद्धच्या सामन्यात वहाबने शानदार गोलंदाजी केली. त्याने ५ गडी मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

मोहम्मद अझरुद्दीनने दाखवली ‘ती’ बॅट, जिच्यामुळे क्रिकेटविश्व झाले होते थक्क!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 2:31 pm

Web Title: pakistan pacer wahab riaz pick virat kohlis phone call over rohit sharmas call adn 96
Next Stories
1 क्रिकेटपटूंनंतर आता फुटबॉलपटूची करोना लढ्यात उडी, गोलकीपरने केला आपल्या जर्सीचा लिलाव
2 मोहम्मद अझरुद्दीनने दाखवली ‘ती’ बॅट, जिच्यामुळे क्रिकेटविश्व झाले होते थक्क!
3 पुढच्या जन्मी मला १२वा खेळाडू म्हणून राहायचे नाही – युवराज सिंग
Just Now!
X