22 January 2021

News Flash

Video : खूर्चीवरुन पडला पाकिस्तानी खेळाडू, इतर सहकाऱ्यांनाही आवरलं नाही हसू

अखेरच्या कसोटीत चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान घडला प्रसंग

क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा असे काही प्रसंग घडतात ज्यामुळे मैदानात उपस्थित प्रेक्षक आणि खेळाडूंनाही हसू आवरत नाही. सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रेक्षकांना क्रिकेटच्या मैदानावर सामना पाहण्यासाठी परवानगी दिली जात नाहीये. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान एक मजेशीर प्रसंग घडला.

पाकिस्तानचा खेळाडू इमाम उल-हक हा राखीव खेळाडूंच्या रांगेत आपल्या सहकाऱ्यांसोबत बसला होता. यावेळी अचानक इमाम उल-हकची खुर्ची वजनामुळे तुटली आणि तो खाली पडला…यावेळी इमामची परिस्थिती पाहून शेजारी बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनाही हसू आवरलं नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या पाकिस्तानी इंग्लंडविरुद्ध मालिकेत फारशी चांगली कामगिरी झाली नाही. सुरुवातीच्या कसोटीत काही खेळाडूंनी इंग्लंडला झुंज देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. कसोटी सामन्यांनंतर पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 1:25 pm

Web Title: pakistan players left in splits as imam ul haq hilariously falls off his chair during 3rd test watch video psd 91
Next Stories
1 IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी रायन हॅरिसची नियुक्ती
2 ७ धावांत ५ बळी… बुमराहने आजच केली होती धडाकेबाज कामगिरी
3 सुशांत मृत्यू प्रकरण: CSKचा बड्या खेळाडूचं महत्त्वाचं ट्विट
Just Now!
X