News Flash

पाकिस्तान-श्रीलंका कसोटी मालिका : पाकिस्तानची ‘कसोटी’

दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पाकिस्तानमध्ये कसोटी सामना होत असल्याने क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

रावळपिंडी : तब्बल १० वर्षांनंतर प्रथमच मायदेशात कसोटी सामना खेळणारा पाकिस्तानचा संघ श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. उभय संघांतील पहिल्या कसोटीला बुधवारपासून रावळपिंडी येथे सुरुवात होणार आहे. अझर अलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानला नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला. परंतु बाबर आझम, यासिर शाह, शाहीन आफ्रिदी या खेळाडूंची कामगिरी पाकिस्तानसाठी दिलासादायक ठरली. २००९मध्ये श्रीलंकन खेळाडूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पाकिस्तानमध्ये कसोटी सामना होत असल्याने क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

  सामन्याची वेळ : सकाळी १० वा.

  थेट प्रक्षेपण : सोनी ईएसपीएन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 12:50 am

Web Title: pakistan sri lanka test series akp 94
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राच्या आघाडीच्या फळीला हादरे
2 राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा : महाराष्ट्राला दुहेरी सर्वसाधारण विजेतेपद
3 IPL 2020 : मुंबई इंडियन्स लावू शकतं विराटवर बोली
Just Now!
X