News Flash

VIDEO : झिम्बाब्वेला हरवल्यानंतर पाकिस्तान संघाने ‘ही’ कृती करत जिंकली सर्वांची मने!

भारतीय चाहत्यांना आठवला अजिंक्य रहाणे!

पाकिस्तानने दोन्ही कसोटींमध्ये झिम्बाब्वेला नमवून मालिका २-०ने जिंकली. दुसर्‍या कसोटी सामन्यात एक डाव आणि १४७ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानने मालिकेत शानदार खेळ केला. या कसोटी मालिकेनंतरही पाकिस्तानचा संघ एका गोष्टीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाने हॉटेल कर्मचार्‍यांना क्रिकेट संघाची जर्सी आणि भेटवस्तू दिल्या.

 

कर्णधार बाबर आझमने हॉटेल कर्मचार्‍यांना टी-शर्ट आणि भेटवस्तू दिल्या. हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक क्रिकेटप्रेमींनी लाईक केले असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.

पाकिस्तान संघाने केलेली ही कृती पाहून भारतीयांनीही कौतुक केले आहे. काही चाहत्यांना भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आठवण झाली. रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने कसोटीत अफगाणिस्तानचा एक डाव आणि २६२ धावांनी पराभव केला होता. या विजयानंतर रहाणेने टीम इंडियासोबत अफगाणिस्तानच्या सर्व खेळाडूंना आमंत्रित करून चषकासह फोटो काढला होता.

 

 

 

बाबरचा नवा पराक्रम

या मालिकाविजयासह बाबर आझम पहिले चार कसोटी सामने जिंकणारा पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन आणि झिम्बाब्वेविरुद्धचे दोन कसोटी सामनेही जिंकले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकाचा फलंदाज असलेल्या बाबरला हा विजयीरथ सुरू ठेवण्याची संधी आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत. यावर्षी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला कसोटी आणि टी-२० सामन्यात पराभूत केले. पाकिस्तानने सहा किंवा त्यापेक्षा अधिक मालिका जिंकण्याची ही सहावी वेळ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:05 pm

Web Title: pakistan team giving jersey and gift to hotel staff after defeating zimbabwe in test series adn 96
Next Stories
1 ‘‘मी इतका वाईट आहे?”, IPLमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे कुलदीप निराश
2 प्रशिक्षण सोडून रोनाल्डो पोहोचला Ferrariच्या मुख्यालयात अन् खरेदी केली सुपरकार!
3 भारताविरुद्धच्या सामन्यानंतर न्यूझीलंडचा सर्वोत्तम कसोटी यष्टीरक्षक होणार निवृत्त
Just Now!
X