13 November 2019

News Flash

VIDEO: Ind vs Pak सामन्याच्या आदल्या रात्री हुक्का पार्लरमध्ये पार्टी करत होते पाकिस्तानी खेळाडू

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाही दिसत आहे

व्हायरल झाले फोटो आणि व्हिडिओ

विश्वचषक स्पर्धेमधील सर्वात महत्वाच्या सामन्यांपैकी एक असणारा भारत पाकिस्तानमधील सामना रविवारी मँचेस्टरच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यामध्ये भारताने शानदार विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर मात करण्याची परंपरा कायम राखली. या सामन्यामध्ये भारतीय संघाने आणि खेळाडूंने अनेक विक्रमांना गवसणी घातली. या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचे चाहते चांगले संतापले असून सततच्या पराभवामुळे त्यांनी आपल्या टीमला लक्ष्य केले आहे. या संतापलेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी आता भारतीय संघाविरुद्धाच्या सामन्याच्या आदल्या रात्री पाकिस्तानी संघ हुक्का पार्लरमध्ये पार्टी करत असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा पती शोएब मलिक सोबत हुक्का पार्लरमध्ये हुक्का पिताना दिसत आहेत.

भारताविरुद्धाच्या सामन्याच्या आधी संपूर्ण पाकिस्तानी टीम रात्री उशीरापर्यंत एका हुक्का पार्लरमध्ये पार्टी करत होते असा आरोप चाहत्यांनी केला आहे. या पार्टीला पाकिस्तानी खेळाडूंच्या पत्नीही उपस्थित होत्या. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये मलिकबरोबर सानिया असून त्यांच्याबरोबर त्यांचा लहान मुलगाही उपस्थित असल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्ये सर्वच पाकिस्तानी खेळाडू हुक्का पिताना दिसत आहेत.

मँचेस्टरमधील प्रसारमाध्यमांमध्ये लेखक, स्तंभलेखक आणि निवेदक म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद शफिक यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये मँचेस्टरच्या दक्षिणेला असणाऱ्या करी माईल परिसरातील एक हुक्का पार्लरमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघातील सर्व खेळाडू भारताविरुद्धाच्या सामन्याच्या आदल्या रात्री होते असं म्हटलं आहे. ‘या लोकांनी सामन्यामध्ये सुमार कामगिरी का केली हे यावरुन दिसून येतेच. या सर्वांना लाज वाटली पाहिजे’, असंही मोहम्मद आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

सामन्यातील पराभवानंतर हे ट्विट व्हायरल झाले. आधीच पराभवाने संतापलेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी या व्हिडिओवरुन संघातील खेळाडूंना चांगलेच खडेबोल सुनावले.

१)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उत्तर द्यावे

२)
शोएबने चांगला सराव केला

३)
…आणि मलिक शुन्यावर बाद झाला

४)
निरुपयोगी खेळाडू

५)
आम्ही त्यांना पाहिलं

काहीजणांनी या फोटोंवर कमेंट करुन सानिया मिर्झाला ट्रोल केले आहे. पाकिस्तानच्या पराभवासाठी सानियाचा मोलाचा वाटा असल्याचा टोल नेटकऱ्यांनी लगावला आहे.

First Published on June 18, 2019 12:19 pm

Web Title: pakistan team midnight party at curry mile in a shisha cafe hours before match against india scsg 91