क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तान संघाकडून पुश-अप्स सेलिब्रेशन
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात पाकिस्तानने तब्बल २० वर्षांनी इंग्लंडवर ७५ धावांनी विजय मिळवला. विजय मिळवल्या नंतर पाकिस्तान संघाने सामना जिंकल्याचे सेलिब्रेशन एका अनोख्या पद्घतीने केले. संपूर्ण संघाने पाच पुश-अप्स मारुन आनंद साजरा केला.
त्याआधि दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने विरोधी संघाच्या धावांचा पाठलाग करताना शतक ठोकले. या शतकानंतर ४२ वर्षीय मिसबाहने एक-दोन नव्हे तर तब्बल १० पुश-अप्स मारले.
मिसबाहने इंग्लंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना शतक ठोकले. आपल्या कारकिर्दीतील दहावे शतक आणि लॉर्ड्सवरील या शतकाचा हा आनंद साजरा करताना मिसबाहने प्रथन त्याचे हेल्मेट काढून प्रेक्षकांसमोर बॅट उंचावली. त्यानंतर त्याने पुश-अप्स मारण्यापूर्वी ड्रेसिंग रुमकडे बघत सॅल्यूट केले. पाकिस्तानच्या या खेळाडूने यावेळी एक-दोन नव्हे तर तब्बल दहा पुश-अप्स मारले. वाढते वय हा केवळ एक आकडा असतो हे मिसबाहच्या या कृतीमुळे सिद्ध झाले. लॉर्ड्सवर मारलेल्या या पुश-अप्सबाबत बोलताना मिसबाह म्हणाला की, जेव्हा कधी मी इंग्लंडविरुद्ध शतक ठोकेन तेव्हा तेव्हा मी दहा पुश-अप्स मारेन असे मी अबोत्ताबाद कॅम्पमधील जवानांना वचन दिले आहे. तसेच माझे हे शतक मी माझ्या पत्नीला समर्पित करतो. मी ज्यावेळी मॅच खेळायला जातो तेव्हा ती नेहमी माझ्यासाठी उपवास करते, असे मिसबाह म्हणाला.