News Flash

फिफा विश्वचषकासाठी पाकिस्तानी चेंडू

पाकिस्तानातील फुटबॉल फारच रसातळाला गेले आहे. पण तरीही ब्राझीलमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या फिफा विश्वचषकात पाकिस्तानची प्रमूख भूमिका असणार आहे.

| May 22, 2014 05:43 am

पाकिस्तानातील फुटबॉल फारच रसातळाला गेले आहे. पण तरीही ब्राझीलमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या फिफा विश्वचषकात पाकिस्तानची प्रमूख भूमिका असणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी चेंडू पुरवण्यात चीनमधील अदिदास कंपनी अपयशी ठरल्यामुळे चेंडूंची मागणी पूर्ण करण्यासाठी सियालकोटमधील एक कंपनी पुढे सरसावली आहे.
सियालकोटमधील या कंपनीने चेंडू पुरवण्याचे कंत्राट मिळवले आहे. जर्मन बुंडेसलीगा, फ्रेंच लीग आणि चॅम्पियन्स लीगसाठी चेंडू बनविणाऱ्या या कंपनीचे मालक ख्वाजा अख्तर यांनी फिफा विश्वचषकाचा एक भाग होण्याचे हे आव्हान पेलले आहे. ‘‘२००६च्या फिफा विश्वचषकादरम्यान मी रस्त्यांवरून फिरत होतो, त्याच वेळी या स्पर्धेसाठी एक ना, एक दिवस तरी मी चेंडू पुरवेन, असे स्वप्न बाळगले होते. आता ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे,’’ असे अख्तर यांनी सांगितले. सियालकोटमधून दरवर्षी ३० दशलक्ष चेंडू पुरवले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 5:43 am

Web Title: pakistan to produce fifa world cup balls
टॅग : Fifa World Cup
Next Stories
1 प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आसामची वाटचाल
2 सिमॉन्सची शतकी चमक!
3 मॅक्क्युलमच्या साक्षीबाबत आयसीसीकडून चौकशी होणार
Just Now!
X