वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलचं एख ट्वीट सध्या चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये ख्रिस गेलने आपण पाकिस्तानला जाणार असल्याचं म्हटलं आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर ख्रिस गेलने उपहासात्मक पद्धतीने हे ट्वीट केलं आहे. त्याच्या या ट्वीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यास काही तासांचा अवधी असताना न्यझीलंड संघाने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडची पाकिस्तान दौऱ्यातून माघार!

ख्रिस गिलने “मी पाकिस्तानला जातोय; माझ्यासोबत कोण येणार?” असं ट्वीट केलं आहे.

खरंच ख्रिस गेल पाकिस्तानला जाणार का?

या ट्वीटनंतर ख्रिस गेल खरंच पाकिस्तानला जाणार का अशी चर्चा रंगली आहे. पण याचं उत्तर नाही असंच आहे. कारण पंजाब किंग्स संघाकडून खेळणारा ख्रिस गेल सध्या आयपीएलसाठी युएईमध्ये आहे. येथे रविवारपासून आयपीएलच्या उर्वरित हंगामाला सुरुवात होत आहे.

४ मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आलं तेव्हा पंजाब संघ आठ सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकत सहा गुणांसह सहाव्या स्थानावर होता. ख्रिस गेलने आठही सामने खेळले असून २५.४५ च्या सरासरीने १७८ धावा केल्या आहेत. ४६ ही ख्रिस गेलची सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. ख्रिस गेलच्या मदतीने आयपीएल जिंकण्यासाठी पंजाब संघ सध्या उत्सुक आहे.