News Flash

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० सामन्यात बाबरची वादळी खेळी; झळकावलं शतक

मालिकेत पाकिस्तानची २-१ ने आघाडी

सौजन्य: icc twitter

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० सामन्यात पाकिस्ताननं ९ गडी राखत विजय मिळवला आहे. या विजयासह ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी अशी फलंदाजी बाबर आझमने केली. बाबरने ५९ चेंडूत १२२ धावांची शतकी खेळी केली. यात १५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. बाबरने टी २० कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं आहे.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय़ घेतला. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळीमुळे कर्णधार बाबरचा हा निर्णय चुकीचा आहे असंच सर्वांना सुरुवातीला वाटलं. मात्र बाबरने निर्णय योग्यच असल्याचं फलंदाजीतून दाखवून दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या मलान आणि मारक्रम या दोघांनी मिळून १०८ धावांची भागिदारी केली. तर शेवटी डुसेननं ३४ धावा करत धावसंख्या २०० च्या पार नेली. दक्षिण आफ्रिकेने ५ गडी गमवत २०३ धावा केल्या.

IPL 2021: मनीष पांडेनं घेतला अप्रतिम झेल; सोशल मीडियावर कौतुक

पाकिस्ताननं २०३ धावांचं लक्ष्य १८ षटकात पूर्ण केलं. बाबरला रिझवाननं चांगली साथ दिली. त्याने ४७ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून १९७ धावांची भागिदारी केली.

माजी क्रिकेटपटू वसीम जाफरचा पाकिस्तानच्या बाबर आझमला इशारा

आता शेवटचा टी २० सामना १६ एप्रिलला खेळला जाणार आहे. पाकिस्तान ही मालिका ३-१ ने जिंकण्याच्या तयारीत मैदानात उतरणार आहे. तर दक्षिण आफ्रिका मालिका वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यापूर्वी पाकिस्तान वनडे मालिका २-१ने जिंकली आहे. या दौऱ्यानंतर पाकिस्तान झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. तिथे ३ टी-२० आणि दोन कसोटी मालिका खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 10:54 pm

Web Title: pakistan won t20 match against south africa babar made first century in t20 rmt 84
टॅग : Pakistan,South Africa,T20
Next Stories
1 IPL 2021: मनीष पांडेनं घेतला अप्रतिम झेल; सोशल मीडियावर कौतुक
2 आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज; तिसरं नाव वाचून आश्चर्य वाटेल!
3 माजी क्रिकेटपटू वसीम जाफरचा पाकिस्तानच्या बाबर आझमला इशारा
Just Now!
X