News Flash

जगातील अव्वल पाकिस्तानी फलंदाजाने भारतीयांसाठी केली प्रार्थना

यापूर्वी, शोएब अख्तरने केले होते आवाहन

बाबर आझम

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. संपूर्ण जग भारतासाठी प्रार्थना करत आहे. आयपीएल खेळणाऱ्या काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली असून उर्वरित खेळाडूंनीही या परिस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने ट्विटद्वारे भारतीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.

यापूर्वी, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही भारतीयांसाठी प्रार्थना केली होती. आता बाबरनेही ट्विट करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. बाबर म्हणाला, ”या अत्यंत कठीण परिस्थितीत माझी प्रार्थना भारतीय लोकांसमवेत आहे. शक्ती दाखवण्याची आणि एकत्र प्रार्थना करण्याची वेळ आता आली आहे. मी लोकांना करोनाच्या कडक प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन करतो. हे आपल्यासाठी सुरक्षित असेल आणि आपण मिळून हे करू शकतो.”

“आपण सर्व एकत्र आहोत”, शोएब अख्तरने भारतीयांसाठी केली प्रार्थना

 

पाकिस्तानचा स्टार फलंदाज असलेल्या बाबर आझमने विश्वविक्रम प्रस्थापित करत विराट कोहलीला मागे टाकले आहे. बाबरने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये वेगवान २००० धावा नोंदवण्याचा विक्रम नोंदवला आहे. या विक्रमात त्याने विराटला ओव्हरटेक केले. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात बाबरने या विक्रमाला गवसणी घातली. ही कामगिरी करण्यासाठी बाबरला ५२ डाव खेळावे लागले. तर, विराटने ५६ डावात २००० टी-२० धावा पूर्ण केल्या होत्या.

वनडेत बाबर अव्वल

काही दिवसांपूर्वी, बाबर आझमने हा जगातील पहिल्या क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. २६ वर्षीय बाबरने तब्बल १२५८ दिवस पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत ही कामगिरी केली. टी-२० क्रमवारीत बाबर ८४४ गुणांसह दुसऱ्या तर विराट ७६२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 4:36 pm

Web Title: pakistani captain babar azam urges india to remain strong amid corona pandemic adn 96
Next Stories
1 IPL सोडून स्मिथ आणि वॉर्नर मायदेशी परतणार?
2 …आणि LIVE शोमध्ये स्टेन रडायला लागला!
3 ‘आयपीएल’वर भयसावट!
Just Now!
X