01 October 2020

News Flash

“पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीही बडबड करतात”

भारताच्या माजी खेळाडूने घेतला समाचार

IPL 2020 स्पर्धा युनायटेड अरब अमिराती (UAE) मध्ये खेळवली जाणार आहे. IPL गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात IPL 2020चे आयोजन करण्यात येणार आहे. ICCने ऑस्ट्रेलियात होणारा T20 World Cup पुढे ढकलल्यानंतर IPLचा मार्ग मोकळा झाला आणि मग IPLबाबत अधिकृत घोषणा झाली. पण ही बाब पाकिस्तानी खेळाडूंना रूचली नाही त्यामुळे त्यांनी ICC आणि BCCI वर आरोप केले. अशा क्रिकेटपटूंना भारताचा माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी चांगलंच सुनावलं आहे.

“जगभरात करोनाचा हाहा:कार माजला आहे. तशातच प्रेक्षकांविना आणि प्रायोजकांशिवाय वर्ल्ड कपसारखी स्पर्धा खेळवण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे ICC आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय अगदी योग्य आहे. पाकिस्तानचे क्रिकेटपटू काहीही बडबडत बसतात. त्यांचे बहुतांश आजी-माजी क्रिकेटपटू हे बोलण्याआधी कसलाही विचार करत नाहीत. भारताने ICCला विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी भाग पाडलं असा दावा, करोनाचे संकट असताना, ते कसा काय करू शकतात?” असा परखड सवाल त्यांनी पाक खेळाडूंना विचारला.

“IPL तर होणारच होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आधीपासूनच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये IPL आयोजित करण्याच्या विचारात होतं कारण त्याच तारखा त्यांच्यासाठी पोषक होत्या. ज्याप्रकारे IPLची योजना आखली गेली आहे ती पद्धत चुकीची आहे असं मला वाटत नाही”, असे मदनलाल म्हणाले. आशिया कप स्पर्धेचे आयोजन कदाचित शक्य होते. पण तो रद्द झाल्यानंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेली विधाने केवळ ईर्ष्येपोटी होती”, अशी टीकादेखील त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 8:28 pm

Web Title: pakistani cricketers do not think before speak comment out of jealousy says former team india player madan lal vjb 91
Next Stories
1 T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच!
2 भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह
3 IPL 2020 : विराटसोबत खेळण्याबाबत फिंच म्हणतो…
Just Now!
X