17 November 2017

News Flash

बेंटले कारसोबत फोटोसेशन उमर अकमलला पडलं महागात

पाकिस्तानी खेळाडू उमर अकमलचा बेंटले गाडीसोबत फोटो.

लोकसत्ता टीम | Updated: July 17, 2017 7:00 PM

पाकिस्तानी खेळाडू उमर अकमल आपल्या बेंटले कारसोबत

पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल पुन्हा एकदा ऑनलाईन ट्रोलिंगचा बळी ठरला आहे. गेले काही दिवस सतत अपयशी होत असल्याने उमर अकमलला संघातून वगळण्यात आलंय. चॅम्पियन्स करंडकातही फिटनेसचं कारण देत त्याला संघाबाहेर काढण्यात आलं होतं. नुकतीच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आपल्या करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली, त्यातूनही उमर अकलमच्या नावावर फुली मारण्यात आली आहे. नुकताच लंडनमध्ये असलेल्या उमर अकमलने आपल्या ‘बेंटले’ गाडीसोबतचा फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला. मात्र नेटीजन्सही त्याला ट्रोल करत त्याची एकाप्रकारे खिल्ली उडवली आहे.

आतापर्यंत १६ कसोटी, ११६ वन-डे आणि ८२ टी-२० सामने खेळणाऱ्या उमरने आपला बेंटले गाडीसोबतचा फोटो ट्वीटरवर शेअर करत, प्रचंड मेहनतीनंतर लंडनमध्ये आराम करतोय अशी कॅप्शन दिली होती. मात्र हे फोटोसेशनही त्याला चांगलच महागात पडलंय.

अनेक ट्रोलर्सही उमर अकमलला या फोटोवरुन चांगलच ट्रोल केलं. यावर उमरने आपल्या अकाऊंटवरुन आपल्या प्रोफाईल वर अशा कमेंट करु नका अशी विनंतीही केली, मात्र तरीही ट्रोल करणाऱ्यांनी उमर अकमलला चांगलंच हैराण केलं.

First Published on July 17, 2017 7:00 pm

Web Title: pakistani player umar akmal posted a picture with his bentley car on twitter people trolled him