दुबईमध्ये सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना सध्या शेख झायद स्टेडियमवर खेळवला जात आहे. याच सामन्यामध्ये पाकिस्तानचा अझर अलीच्या धावबाद होण्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु असताना अझर अली आणि अशद शफीक यांची जोडी मैदानावर जमली होती. ऑस्ट्रेलीयन गोलंदाज पीटर सिडेलने टाकलेला एक चेंडू स्लीपला टोलवला. चेंडू सीमेरेषेकडे जात असताना पाहून अली आणि शफीकने क्रीजदरम्यान धाव काढणे थांबवले. मात्र चेंडू सिमेरेषेजवळ जाऊन थांबला. चौकार गेल्याचे समजून अली क्रीजच्यामध्ये जाऊन शफीकशी चर्चा करु लागला. मात्र सीमेरेषेजवळ गेलेला चेंडू क्षेत्ररक्षण करणाऱ्या मिशेल स्टार्कने यष्टीरक्षक टीम पिनेकडे फेकला. टीमने चेंडू हातात येताच क्षणाचाही विलंब न लावता स्टॅम्पवरील बेल्स उडवल्या. या सर्व गोंधळात अली आणि शफीकला काय सुरु आहे याची काही कल्पनाच येत नव्हती. अखेर चौकार जाण्याऐवजी चेंडूची गती कमी होऊन तो मध्येच थांबल्याने आपण धावबाद झाल्याचे अलीच्या लक्षात आले आणि तो पव्हेलियनकडे चालू लागला. अलीच्या धावबाद होण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेकजण पाकिस्तानी फलंदाजांची टर उडवताना दिसत आहेत.

अनेकांनी अलीचे अशापद्धतीने बाद होणे मजेदार असल्याचे म्हणतच क्रिकेट खेळताना सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगितले.

चौकार गेल्याचे समजून बाद झाला

बाद होण्याची अनोखी पद्धत

पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा सर्वोत्तम खेळ

बाकी फलंदाजांसाठी आदर्श

धावबाद होण्याची सर्वात बावळट पद्धत

फक्त पाकिस्तानचे खेळाडू हे करु शकतात

सामन्याच्या दृष्टीने अलीच्या धावबाद होण्याने पाकिस्तानला मोठा फटका बसला. मैदानावर स्थिरावलेला अली अशा मजेदार पद्धतीने धावबाद झाला तेव्हा ६४ धावांवर खेळत होता. अलीच्या या चमत्कारीक पद्धतीने बाद होण्यामुळे समालोचकही गोंधळले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistans azhar ali gets run out in comical fashion
First published on: 18-10-2018 at 15:12 IST