News Flash

पंकज अडवाणीला पराभवाचा धक्का

पंजाबच्या धर्मेद्र लिली याने जागतिक विजेता खेळाडू पंकज अडवाणी याला पराभूत करीत राष्ट्रीय निवड चाचणी स्नूकर स्पर्धेत सनसनाटी विजय मिळविला.

| May 16, 2015 06:33 am

पंजाबच्या धर्मेद्र लिली याने जागतिक विजेता खेळाडू पंकज अडवाणी याला पराभूत करीत राष्ट्रीय निवड चाचणी स्नूकर स्पर्धेत सनसनाटी विजय मिळविला. स्पर्धेतील पंधरा रेड विभागात त्याने हा सामना ४-३ अशा फ्रेम्सने जिंकला.
पूना क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अडवाणी याला संमिश्र यशास सामोरे जावे लागले. त्याला धर्मेद्रने ४५-८५, १०८-९, २९-७५, ९०-४२, २१-७८, ६३-५२, ५७-१५ असे हरविले. धर्मेद्र याने या सामन्यातील दुसऱ्या फ्रेममध्ये ९३ गुणांचा ब्रेक नोंदविला. त्याआधी धर्मेद्र याला पेट्रोलियम मंडळाचा खेळाडू कमल चावला याने १-८०, ७६-७, २९-७१, ५८-१६, ८८-१, ४१-४९, ६१-५२ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले होते. पंकज याने साखळी गटात पहिल्या सामन्यात देवेंद्र जोशी या तुल्यबळ खेळाडूवर ५७-५२, ७८-३७, ८१-१, ७४-६७ असा विजय नोंदविला. देवेंद्र याला पहिल्या साखळी सामन्यात चावला याने ३५-७६, ८६-०, ६८-४५, ७९-३५ असे नमविले.
फैजल खान याने आव्हान राखताना मनन चंद्रा याचा ७३-६, ७७-६९, ३२-८७, ४२-६७, १७-७२, ७२-३७, ६७-२ असा उत्कंठापूर्ण लढतीनंतर पराभव केला. चंद्रा याने त्याआधीच्या सामन्यात शहाबाज खान याच्यावर ५९-४६, १०९-२९, ८३-२०, ६७-५२ असा सहज विजय मिळविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2015 6:33 am

Web Title: pankaj advani loss
Next Stories
1 अमिरातीचा अट्टहास ‘पीसीबी’ने सोडला
2 विराटची बांगलादेश दौऱ्यातून माघार?
3 गगन नारंगची ऑलिम्पिकवारी पक्की
Just Now!
X