भारताचा पंकज अडवाणी विश्व स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून त्याने आपले पदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत पंकजने अ‍ॅलेक्स बोर्गवर ६-० असा दणदणीत विजय मिळवला. ही स्पर्धा जिंकल्यास त्याचे हे १५ वे जागतिक दर्जाचे जेतेपद ठरेल. या स्पर्धेतील पुरुष गटामध्ये पंकज वगळता एकाही खेळाडूचा निभाव लागू शकला नाही. आर्यलडचा ग्रेग सॅसले आणि जर्मनीच्या लुकास क्लेकर्स यांच्यातील विजेत्याशी पंकजला अंतिम फेरीत दोन हात करावे लागणार आहेत. भारताच्या रफात हबिबला उपांत्यपूर्व फेरीत जेसॉन पेपलॉवकडून पराभव पत्करावा लागला.