दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून मात केली. या विजयासह भारताने 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 165 धावांचं आव्हान भारताने कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. मात्र या सामन्यात यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

अवश्य वाचा – विराटच्या अर्धशतकाने मालिका बरोबरीत, अखेरच्या टी-20 सामन्यात भारत विजयी

ऋषभ पंत टी-20 क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. आजच्या सामन्यात अँड्रू टायच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात ऋषभने यष्टीरक्षक अॅलेक्स केरीकडे झेल दिला. याआधी ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आपलं पदार्पण हे पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून केलं होतं. इंग्लंड दौऱ्यात ऋषभने आपल्या फलंदाजीची चमकही दाखवली होती. मात्र आताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला आपली छाप पाडता आलेली नाहीये.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात कॅप्टन कोहली ठरला अनोख्या विक्रमाचा मानकरी