पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंन्टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पापुआ न्यू गिनी (पीएनजी) हा नवा संघ जगातील दिग्गज संघासोबत खेळताना दिसणार आहे. नुकतेच दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या पात्रता फेरीत पीएनजी संघाने केनियावर ४५ धावांनी विजय प्राप्त करुन ट्नेंटी २० विश्वचषक स्पर्धेत सहभागावर शिक्कामोर्तब केले.

केनिया संघासमोबत झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजीला करताना पीएनजी संघाने १९.३ षटकांत ११८ धावा केल्या.मात्र केनियाला पीएनजी संघाने दिलेले सोपे विजयी आवाहन यशस्वीपणे पेलले नाही. केनिया संघ केवळ ७३ धावांवर आवरला. पीएनजी संघाकडून पोकना आणि वाला यांनी भेदक मारा करत प्रत्येकी ३ गडी बाद करण्याची किमया साधली, तर डेमियन राऊ आणि वानुवा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या विजयाच्या जोरावर पीएनजी संघ ‘अ’ गटात ६ पैकी ५ गुण मिळवून सर्वोच्च स्थानी आला. विशेष म्हणजे, पीएनजी संघाचा विश्वचषकातील प्रवेश हा नेदरलँड आणि स्कॉटलंडमधील लढतीवर अवलंबून होता. विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी नेदरलँडपुढं स्कॉटलँडला १२.३ षटकात हरवण्याचं आव्हान होतं. मात्र, या संघाला ते आव्हान पेलवलं नाही. स्कॉटलँडनं ८ गडय़ांच्या मोबदल्यात १३० धावा केल्या होत्या. नेदरलँडनं हा सामना १७ षटकांत १३१ धावा करून जिंकला. मात्र, अपेक्षित वेगानं विजय न मिळाल्यानं पीएनजीचा विश्वचषकाचा मार्ग सुकर झाला. मात्र पुढील वर्षी होणार्या ट्वेंटी २० विश्वचषकाच्या माध्यमातून पीएनजी संघाच्या खेळाडूंचा परिचय क्रिकेटप्रेमींना होणार.