राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या महिला प्रशिक्षणार्थिंचं सरावादरम्यान चित्रीकरण केल्याप्रकरणी, प्रख्यात दिव्यांग जलतरणपटू प्रशांत कर्माकरला ३ वर्षांसाठी निलंबीत करण्यात आलं आहे. भारतीय पॅरालिम्पीक समितीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. कर्माकर यांनी २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय जलतरणपटूंचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलेलं आहे.

२०१७ साली जयपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत सर्वप्रथम हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर अनेक महिला खेळाडूंनी कर्माकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या चौकशीत कर्माकर दोषी आढळल्यामुळे त्यांना ३ वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. या शिक्षेविरोधात अपील करण्याची मुभा कर्माकर यांना देण्यात आलेली आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

मात्र कर्माकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, पॅरालिम्पिक समितीमधले काही गैरप्रकार मी उघड केल्यामुळे माझ्याविरोधात हा कट रचला जात असल्याचं कर्माकर यांनी म्हणलंय. जयपूरमध्ये झालेली घटना ही मला अडकवण्यासाठी निर्माण करण्यात आलेलं एक षडयंत्र आहे. मी एकावेळी ६-७ खेळाडूंना प्रशिक्षण देतो. माझ्याकडे शिकणाऱ्या एका मुलीच्या वडीलांनी तिचा पोहतानाचा व्हिडीओ काढला, याच व्हिडीओचा माझ्याविरोधात वापर करुन मला अडकवण्यात आल्याचं कर्माकर म्हणाले. त्यामुळे या प्रकरणात आता नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पहावं लागणार आहे.