रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत जागतिक क्रमवारीत प्रथमच चौथे स्थान मिळवले. चौथे स्थान मिळवताना मेदवेदेवने विक्रमी २० ग्रॅँडस्लॅम विजेत्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररला मागे टाकले. मेदवेदेवने अंतिम फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हवर ५-७, ६-४, ६-१ असा विजय मिळवला. पहिला सेट गमावूनही मेदवेदेवने ही बाजी मारली. त्याचे हे या वर्षांतील पहिले विजेतेपद ठरले.