22 September 2020

News Flash

फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धा : नेयमारमुळे पॅरिस सेंट जर्मेनची ‘फ्रेंच क्रोंती’

मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत विक्र मी १३ व्या विजेतेपदाची कमाई

मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत विक्र मी १३ व्या विजेतेपदाची कमाई

ब्राझिलचा नामांकित खेळाडू नेयमारने साकारलेल्या एकमेव निर्णायक गोलच्या बळावर पॅरिस सेंट जर्मेनने (पीएसजी) फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंट इटिनीला १-० असे पराभूत केले.

सेंट जर्मेनचे हे विक्रमी १३ वे विजेतेपद ठरले. स्टेट दी फ्रान्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नेयमारने १४ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. नेयमारला गोलसाहाय्य करणाऱ्या किलियान एम्बाप्पेला मात्र पायाच्या दुखापतीमुळे ३३ व्या मिनिटाला मैदानावर सोडावे लागले. त्यामुळे चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. फ्रान्स सरकारने पाच हजार चाहत्यांना प्रवेशाची परवानगी दिली होती. परंतु २,८०५ चाहत्यांनीच  स्टेडियम गाठले.

अटलांटा-युव्हेंटस यांच्यातील चुरस कायम

अटलांटाने सेरी ए फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात एसी मिलानला १-१ असे बरोबरीत रोखल्याने त्यांची ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटसशी विजेतेपदाची शर्यत अद्यापही कायम आहे. मिलानसाठी हकान अ‍ॅलनग्लूने १४ व्या मिनिटाला गोल नोंदवला, परंतु दुवान झपाटाने ३४ व्या मिनिटाला गोल साकारून अटलांटाला बरोबरी साधून दिली. अटलांटा ३६ सामन्यांतून ७५, तर युव्हेंटस ३५ सामन्यांतून ८० गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 2:42 am

Web Title: paris st germain beat saint etienne to win french cup final zws 70
Next Stories
1 २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल दहांमध्ये!
2 डाव मांडियेला : मेरुप्रस्तार!
3 Eng vs WI : विंडीजचा पाय खोलात, इंग्लंडची सामन्यावर मजबूत पकड
Just Now!
X