01 March 2021

News Flash

अॅमस्टरडॅममध्ये पी. कश्यपचा पासपोर्ट हरवला, क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड आले मदतीला धावून

कश्यप डेन्मार्क ओपनमध्ये होणार सहभागी

अॅमस्टरडॅम येथे स्पर्धेदरम्यान भारतीय बॅडमिंटनपटू पी. कश्यपचा पासपोर्ट हरवल्याची घटना घडली. यामुळे डेन्मार्क ओपन स्पर्धेला जाण्यासाठी कश्यपपुढे मोठा यक्षप्रश्न उभा राहिला. यावेळी कश्यपने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली.

कश्यपने केलेल्या ट्विटची दखल घेत क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी परराष्ट्र मंत्रालयाती अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, कश्यपला डेन्मार्कच्या प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन दिली. यानंतर कश्यपनेही राज्यवर्धन राठोड यांचे आभार मानले.

पी. कश्यप आणि भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हे 16 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 3:02 pm

Web Title: parupalli kashyap loses passport in amsterdam rajyavardhan rathore sends help
टॅग : P Kashyap
Next Stories
1 Youth Olympic : कुस्तीपटू सिमरनला रौप्यपदक
2 सुलतान जोहर चषक – भारताच्या खात्यात रौप्यपदक, अंतिम फेरीत इंग्लंड विजयी
3 IND vs WI : भारताच्या डावावर कर्णधार जेसनचा ‘होल्ड’!
Just Now!
X