01 December 2020

News Flash

यू मुंबाला नमवून पाटणा पायरेट्स गुणतालिकेत अव्वल

बंगालला उपांत्य फेरीची आस

जयपूरचा जसवीर सिंग बंगालचा बचाव भेदताना.

डावपेच आखण्यात केलेल्या चुकांमुळे यू मुंबाला प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामात शनिवारी पाटणा पायरेट्सकडून पराभव पत्करावा लागला. बंगळुरूच्या टप्प्यात चतूर खेळ करून मुंबाला विजय मिळवून देणाऱ्या अनुप कुमार आणि राकेश कुमार या जोडीला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. पाटण्याने ३४-२४ असा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलातील लढतीत पाटण्याने सुरूवातीला आघाडी घेत सामन्याची उत्सुकता संपवून टाकली. राजेश मोंडल आणि प्रदीप नरवाल यांनी प्रत्येकी दोन चढाईत यू मुंबाच्या ५-५ खेळाडूंना बाद केले. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर पाटण्याने मध्यंतराला १९-८ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात यू मुंबा प्रतिकार करेल असे वाटत होते, परंतु त्यांच्याकडून नीरस खेळ झाला. अनुप शेवटच्या दहा मिनिटांत दोन चढाईत केवळ निदान रेषा पार करून माघारी परतला. दुप्पट गुणाने पिछाडीवर असतानाही अनुपच्या या डावपेचाने मुंबाचे खेळाडूही अवाक राहिले. पायरेट्सचा कर्णधार धर्मराज चेरालथनने एक सुपर पकडीसह ७ गुण पटकावले. त्याला फैझल अत्राचली (३), बाजिराव होडगे (२) आणि कुलदीप सिंग (२) यांची पकडीत चांगली साथ लाभली. कुलदीपनेही एक सुपर पकड केली. चढाईत राजेश (८) आणि प्रदीप (४) यांनी सर्वोत्तम खेळ केला. यू मुंबाचा कर्णधार अनुप १५ पैकी २ चढाईत यशस्वी ठरला, तर राकेश कुमारच्या दोन्ही चढाई अयशस्वी ठरल्या.

बंगालला उपांत्य फेरीची आस

यांग कुन लीच्या आक्रमक खेळाच्या जोरावर बंगाल वॉरियर्सने घरच्या प्रेक्षकांसमोर जयपूर पिंक पँथर्सवर ३२-२५ असा विजय मिळवला. कून लीने १५ चढाईत ८ यशस्वी चढाया करत १२ गुणांची कमाई केली, तर पकडीतही त्याने एक गुण पटकावला. त्याला सुरजित नरवाल (६) आणि कर्णधार निलेश शिंदे (४) यांनी चांगली साथ दिली. या विजयामुळे बंगालच्या उपांत्य फेरीच्या आशा अजून कायम राखल्या आहेत.

आजचे सामने

  • पुणेरी पलटण वि. जयपूर पिंक पँथर्स
  • बंगाल वॉरियर्स वि. पाटणा पायरेट्स
  • सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 3:25 am

Web Title: patna pirates thump u mumba 34 24
Next Stories
1 ‘झिका’मुळे रौनिच, हालेपची ऑलिम्पिकमधून माघार
2 ऑलिम्पिक पदक मिळवत गोल्फची लोकप्रियता वाढवणार
3 खेळाडूंच्या जिवाशी खेळ!
Just Now!
X