News Flash

जागतिक संघात कॉलिंगवूडचा समावेश

फॅफ डय़ू प्लेसिसकडे नेतृत्व

माजी अष्टपैलू खेळाडू पॉल कॉलिंगवूड

फॅफ डय़ू प्लेसिसकडे नेतृत्व

पुढील महिन्यात लाहोर येथे होणाऱ्या स्वतंत्रता चषक क्रिकेट मालिकेसाठी पाकिस्तान संघाशी सामना करणाऱ्या जागतिक संघात इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू पॉल कॉलिंगवूडचा समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ डय़ू प्लेसिसकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, प्रशिक्षकपदाची जबाबदारी अँडी फ्लॉवरकडे देण्यात आली आहे.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज अशा सात देशांचा समावेश जागतिक संघात करण्यात आला आहे. आफ्रिकेचा सलामीवीर हशिम अमला आणि वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉकेलसुद्धा या संघातून खेळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात लाहोरला झालेल्या पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्यात खेळलेला वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीचासुद्धा या संघात समावेश आहे. याचप्रमाणे इंग्लंडचे डॅविड मालन आणि ख्रिस जॉर्डन यांनी या संघात स्थान मिळवले आहे. कॉलिंगवूडला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) या सामन्यासाठी विचार करण्यात आली आणि त्याने आपला त्वरित होकार दिला.

२००९मध्ये लाहोर येथे श्रीलंकेच्या संघाला स्टेडियमकडे घेऊन जाणाऱ्या बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेट हद्दपार झाले होते. पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पर्व सुरू व्हावे, या हेतूने १२, १३ आणि १५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्रता चषक ट्वेन्टी-२० मालिका होणार आहे. या सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी एक लाख डॉलर मानधन मिळणार आहे.

जागतिक संघ

फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), हशिम अमला (दक्षिण आफ्रिका), सॅम्युअल बद्री (वेस्ट इंडिज), जॉजॅ बेली (ऑस्ट्रेलिया), पॉल कॉलिंगवूड (इंग्लंड), बेन कटिंग (ऑस्ट्रेलिया), ग्रँट एलियट (न्यूझीलंड), तमिम इक्बाल (बांगलादेश), डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल (दक्षिण आफ्रिका), टिम पेनी (यष्टीरक्षक, ऑस्ट्रेलिया), थिसारा परेरा (श्रीलंका), इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका), डॅरेन सॅमी (वेस्ट इंडिज)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 2:48 am

Web Title: paul collingwood in world xi squad
Next Stories
1 खो-खो मैदानावरचा आणि आयुष्याचा
2 धोनी तर नेहमीच जिंकतो; आज भुवनेश्वरनं जिंकलं!
3 विश्वचषकानंतर महिला क्रिकेटला ‘अच्छे दिन’- स्मृती मंधाना
Just Now!
X