News Flash

आफ्रिदीला निवृत्तीसाठी पीसीबीकडून संधी

‘दैनिक जंग’च्या वृत्तानुसार आफ्रिदीने स्वत:हून निवृत्ती जाहीर करावी, अशी पीसीबीची इच्छा आहे.

| September 13, 2016 03:44 am

 

शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्वत:हून निवृत्ती जाहीर करावी यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) हालचाली सुरू केल्या आहेत. पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी आफ्रिदीची संघात निवड करण्यात आली आहे आणि या मालिकेदरम्यान तो निवृत्ती जाहीर करील, अशी पीसीबीला अपेक्षा आहे.

‘दैनिक जंग’च्या वृत्तानुसार आफ्रिदीने स्वत:हून निवृत्ती जाहीर करावी, अशी पीसीबीची इच्छा आहे.  वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेनंतर पाकिस्तान पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत एकही ट्वेन्टी-२० मालिका खेळणार नाही. त्यामुळे त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.

‘आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेसाठी संघबांधणी करायची आहे. त्यामुळे आफ्रिदीला ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळणार नाही.  त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्याचा प्रस्ताव त्याला देण्यात आला आहे,’ असे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 3:44 am

Web Title: pcb wants shahid afridi to consider retirement
Next Stories
1 अमेरिकेच्या महिलांचे निर्विवाद वर्चस्व
2 पॅरालिम्पिकमध्ये दीपाने रचला इतिहास, गोळाफेकमध्ये मिळवले रौप्य पदक
3 महिला कुस्तीपटूंच्या जागतिक क्रमवारीत साक्षी मलिकची चौथ्या स्थानी झेप