अर्जुन पुरस्कारासाठी नाव वगळल्यानंतर भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच.एस.प्रणॉयने आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या देशात चांगल्या कामगिरीची दखल घेतली जात नाही, जर तुम्ही पुरस्काराची आशा करत असाल तर तुमची योग्य माणसांशी ओळख असणं गरजेचं आहे. प्रणॉयने ट्विटर अकाऊंटवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अर्जुन पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये बी. साईप्रणीत आणि पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत या खेळाडूचा अपवाद वगळला तर एकाही बॅडमिंटनपटूला स्थान देण्यात आलेलं नाहीये. बायूचंग भूतिया, मेरी कोम यांचा समावेश असलेल्या १२ जणांच्या समितीने अर्जुन आणि खेळरत्न पुरस्कारांच्या यादीवर शिक्कामोर्तब केलं आहे. हे चित्र अतिशय विदारक असून यावर काहीही उपाय नसल्याचंही प्रणॉयने हताशपणे कबूल केलं आहे.

पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं पुढीलप्रमाणे –

राजीव गांधी खेल रत्न – बजरंग पुनिया ( कुस्ती) व दीपा मलिक (पॅरा अ‍ॅथलिट)

द्रोणाचार्य पुरस्कार – विमल कुमार (बॅडमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनिस), मोहिंदर सिंग ढिल्लोन (अ‍ॅथलिट)

जीवनगौरव पुरस्कार – मेर्झबान पटेल (हॉकी), रंबीर सिंग खोक्कर (कबड्डी), संजय भरद्वाज (क्रिकेट)

अर्जुन पुरस्कार – तजिंदरपाल सिंग तूर (अ‍ॅथलिट), मोहम्मद अनास याहीया (अ‍ॅथलिट), एस.भास्करन (बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), रवींद्र जडेजा (क्रिकेट), चिंगलेन साना (हॉकी), अजय ठाकूर (कबड्डी), गौरव सिंग गिल (मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत (पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील (शूटींग), हरमित राजुल देसाई (टेबल टेनिस), पूजा धांडा (कुस्ती), फॉदा मिर्झा (इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू (फुटबॉल), पूनम यादव (क्रिकेट), स्वप्ना बर्मन (अ‍ॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर (पॅरा अ‍ॅथलिट), बी. साईप्रणित (बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल (पोलो)

ध्यानचंद पुरस्कार – मॅन्युएल फ्रेडीक्स (हॉकी), अरुप बसाक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्ती), नितीन किर्तने (टेनिस), सी. लाल्रेमसंगा (तिरंदाजी)

अवश्य वाचा –  रविंद्र जाडेजाला मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर