अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेत स्वित्र्झलडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने भारताच्या लिएण्डर पेसने मिश्र दुहेरी, तर सानिया मिर्झाने महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली आहे.
चौथ्या मानांकित पेस आणि हिंगीसने आपली विजयी घोडदौड कायम राखताना द्वितीय मानांकित रोहन बोपण्णा (भारत) आणि यंग-जॅन चॅन (चायनीज तैपेई) जोडीला ६-२, ७-५ असे नामोहरम केले. अंतिम फेरीत पेस-मिर्झा जोडीची बेथानी मॅटीक-सँड्स आणि सॅम क्युरी या अमेरिकेच्या जोडीशी गाठ पडणार आहे.
मार्टिना हिंगीससोबत खेळणाऱ्या मला आणि सानियाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर येणाऱ्या सर्व भारतीयांचा मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया लिएण्डर पेसने व्यक्त केली.
त्याआधी, हिंगीससोबत सानियाने इटलीच्या सारा इराणी आणि फ्लाव्हिया पेनेट्टा जोडीचा ६-४, ६-१ असे पराभूत केले. दुसरी उपांत्य लढत कॅसी डेलेक्युआ (ऑस्ट्रेलिया)-यारोस्लाव्हा श्वेडोव्हा (कझाकस्तान) आणि अ‍ॅना लीना ग्रोइनफील्ड (जर्मनी)-कोको व्हँडेवेगे (अमेरिका) यांच्यात होणार आहे.