News Flash

पीटर मोल्नार जगज्जेता!

साऱ्या जगाचे डोळे जे पाहण्यासाठी आसुसलेले होते.. तो क्षण काही मिनिटांवर येऊन ठेपला होता.. पण तरीही ‘मि. युनिव्हर्स’मधून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताब विजेता कोण होणार,

| December 10, 2014 01:12 am

पीटर मोल्नार जगज्जेता!

साऱ्या जगाचे डोळे जे पाहण्यासाठी आसुसलेले होते.. तो क्षण काही मिनिटांवर येऊन ठेपला होता.. पण तरीही ‘मि. युनिव्हर्स’मधून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताब विजेता कोण होणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती.. एकीकडे भारताच्या संग्राम चौगुलेच्या नावाची घोषणा सुरू होती, तर दुसरीकडे बी. महेश्वरनची.. जगज्जेत्याची घोषणा करताना उत्कंठा शिगेला पोहोचली होती.. नेमका विजेता कोण, याचा अंदाज कोणालाही येत नव्हता.. विजेत्याच्या घोषणेची वेळ जवळ आल्यानंतर साऱ्यांचेच हृदय धडधडत होते.. काळजाचा ठोका चुकत होता.. आणि अखेर कडव्या प्रतिस्पध्र्याचे आव्हान मोडीत काढत हंगेरीच्या पीटर मोल्नारने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताबाला गवसणी घातली. भारताचा संग्राम (८५ किलो) आणि महेश्वरन (७० किलो) यांनी ‘मि. युनिव्हर्स’चा किताब पटकावल्यावर मोल्नारला कडवी झुंज दिली, पण आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर मोल्नारने जगज्जेता होण्याचा मान पटकावला. पुरुष आणि महिला गटाचे सांघिक विजेतेपद थायलंडने मिळवले.
भारताने पुरुषांच्या सांघिक गटामध्ये १३६ गुणांनीशी दुसरे स्थान पटकावले, यामध्ये एकूण १३ पदकांचा समावेश आहे. संग्राम आणि महेश्वरन यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर शिवकुमार, विपीन पीटर, जगदीश लाड, नितीन म्हात्रे आणि हरी प्रसाद यांनी रौप्यपदक पटकावले. भारताच्या राजू खान, अनिल गोशिलकर, बॉबी सिंग, सुनीत जाधव, स्वप्निल नरवणकर आणि राम निवास यांनी कांस्यपदक मिळवले.
गटवार निकाल
५५ किलो : १. फाम व्हॅन माच (व्हिएतनाम), २.  नितीन म्हात्रे (भारत), ३. चुलुनबाझर मँगानेबेलेग (मंगोलिया).
६० किलो : १. जिरापन पोंगकाम (थायलंड), २. ग्युएन थोंग (व्हिएतनाम), ३. स्वप्निल नरवणकर (भारत).
६५ किलो : १. न्युएन व्हॅन लाम (व्हिएतनाम), २. शिव कुमार (भारत), ३. राजू खान (भारत).
७० किलो : १. बी. महेश्वरन (भारत), २. विचाई सिंगथाँग (थायलंड), ३. अनिल गोशिलकर (भारत).
७५ किलो : १. सझाली समद (मलेशिया), २. अब्बास सलारी (इराण), ३. बॉबी सिंग (भारत).
८० किलो : १. मार्सिओ गोन्सालवीस (ब्राझील), २. विपीन पीटर (भारत), ३. सुनीत जाधव (भारत).
८५ किलो : १. संग्राम चौगुले (भारत), २. पानुपोंग प्रतीप (थायलंड), ३. जुन्स नुरलान (मंगोलिया).
९० किलो : १. अलिरेझा सरलाक (इराण), २. जगदीश लाड (भारत), ३. राम निवास (भारत).
१०० किलो : १. पीटर मोल्नार (हंगेरी), २. इहाब कैदर (जॉर्डन), ३. मोहम्मद आझमी (अफगाणिस्थान).
१०० किलोवरील : १. मोहम्मद कफी (इराण), २. हरी प्रसाद (भारत), ३. नॅगी झाबोल्कस (हंगेरी).
सांघिक जेतेपद
महिला : १. थायलंड (९९), २.  हंगेरी (९७), ३. युक्रेन (९१).
पुरुष : १. थायलंड (१४८), २. भारत (१३६), ३. १३४ (इराण).
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स पीटर मोल्नार (हंगेरी).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2014 1:12 am

Web Title: peter molnar win title of mr universe
Next Stories
1 तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या बैठकींना श्रीनिवासन यांनी हजर राहू नये!
2 उद्योजक भूपतीची समांतर सव्‍‌र्हिस
3 भारतभेटीने फेडरर भारावला!
Just Now!
X