22 October 2019

News Flash

ह्य़ुज कुटुंबीयांनी मानले ऑस्ट्रेलियाचे आभार

कुटुंबातील कर्ता तरुण सदस्य गमावल्याच्या दु:खातून सावरण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल फिलीप ह्य़ुजच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.

| December 15, 2014 12:47 pm

कुटुंबातील कर्ता तरुण सदस्य गमावल्याच्या दु:खातून सावरण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल फिलीप ह्य़ुजच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत. वडील ग्रेगरी, आई व्हर्जिनिया, बहिणी मेगन आणि भाऊ जेसन यांनी या कठीण कालखंडात पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. फिलीपच्या जाण्याचे दु:ख शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. मात्र तुमच्या भरीव पाठिंब्यामुळे आम्हाला या दु:खातून सावरायला मदतच होईल. फिलीपचा मित्रपरिवार, मॅक्सव्हिलेमधील रहिवासी, क्रिकेटविश्वाशी संलग्न व्यक्ती, आजी-माजी खेळाडू आणि जगभरातून फिलीपसाठी प्रार्थना करणारे शुभेच्छुक या साऱ्यांचे आम्ही ऋणी आहोत. फिलीपवर सर्वोत्तम उपचार व्हावेत यासाठी सिडनीतील सेंट व्हिन्सेंट रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे ह्य़ुज कुटुंबीयांनी विशेष आभार मानले आहेत.

First Published on December 15, 2014 12:47 pm

Web Title: phillip hughes family australian team
टॅग Phillip Hughes