करोना काळात पुन्हा एकदा क्रिकेटची सुरुवात करताना शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक सामथ्र्य जपणे आवश्यक आहे, असे ‘आयपीएल’मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने म्हटले आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे सर्व खेळाडू गुरुवारी मुंबईत एकत्र आले असून, रविवारी संयुक्त अरब अमिराती येथे ‘आयपीएल’ खेळण्यासाठी रवाना होणार आहेत. ‘‘संयुक्त अरब अमिरातीचा दौरा हा प्रत्येकासाठी आव्हानात्मक आहे. मात्र अन्य खेळाडूंप्रमाणे मीदेखील गेल्या काही महिन्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यातच कुटुंबासोबत सर्वाधिक वेळ घालवता आला त्यामुळे मनोबल उंचावलेले आहे. यंदाचा आयपीएल प्रत्येकासाठी आगळावेगळा आहे. सकारात्मक दृष्टिकोन या काळात आवश्यक आहे,’’ असे रहाणेने सांगितले.
मलिंगा काही ‘आयपीएल’ सामन्यांना मुकणार?
वैयक्तिक कारणास्तव श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. वडिलांची शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे ३६ वर्षीय मलिंगा ‘आयपीएल’साठी उशिराने पोहोचणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 22, 2020 12:01 am