वर्ल्डकपच्या सुरूवातीला दमदार खेळी करणाऱ्या भारतीय संघाला बुधवारी न्यूझीलंडच्या संघाने बाहेरचा रस्ता दाखवला. भारतीय संघाचा १८ धावांनी पराभव होऊन भारतीय संघ वर्ल्डकपच्या स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांनी राजीनामा दिला आहे.
टीम इंडियाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट आणि फिटनेस कोच शंकर बसु यांनी आपला राजीनामा बीसीसीआयला पाठवला आहे.
फिजिओ फरहार्ट यांचा करार विश्वचषकाच्या अखेरीच संपणार होता. बीसीसीआयने हा करार वाढवण्याची देखील तयारी दाखवली होती, परंतु त्यांनी नकार दिला.
Whilst my last day with the team did not turn out as I wanted it to, I would like to thank @BCCI for the opportunity to work with the team for the last 4 years. My best wishes to all of the players and support staff for the future #TeamIndia
— Patrick Farhart (@patrickfarhart) July 10, 2019
फिजिओ फरहार्ट यांनी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये असे लिहीले आहे की,
भारतीय संघासोबत आज माझा शेवटचा दिवस होता. पण भारतीय संघ अपेक्षेप्रमाणे खेळ करू शकला नाही. बीसीसीआयने टीम इंडियासोबत ४ वर्ष काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो. टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 11, 2019 4:38 pm