News Flash

जेतेपदानंतर इंग्लंडच्या पत्रकारने सेहवागला डिवचले, विरूने केली होती बोलती बंद

तीन वर्षांपूर्वी दोघांमध्ये ट्विटरवर शाब्दिक चकमक झाली होती.

जेतेपदानंतर इंग्लंडच्या पत्रकारने सेहवागला डिवचले, विरूने केली होती बोलती बंद

न्यूझीलंडचा पराभव कर इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरल्यानंतर इंग्लंडचा दिग्गज पत्रकार पीयर्स मॉर्गन यांनी वीरेंद्र सेहवागला डिवचले आहे. सेहवाग आणि पीयर्स मॉर्गन यांच्यातील वाद ऑलम्पिक स्पर्धेपासूनचा आहे. पीयर्स मॉर्गनने इंग्लंडच्या विजेतेपदानंतर ट्विट करत सेहवागला तीन वर्षांपूर्वीचा वाद उकरून काढला.

२०१६ मध्ये पीयर्सने भारताच्या ऑलम्पिक मधील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, ‘१०२ कोटी लोकसंख्या असलेल्या देश दोन पदके जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करतोय’, असा टोमणा मारला होता. त्यावर वीरेंद्र सेहवागने जोरदार उत्तर देत बोलती बंद केली होती.

सेहवागने ट्विट केले होते की, ‘आम्ही छोट्यातील छोट्या गोष्टीचा आनंद साजरा करतो. पण ज्यांनी क्रिकेटची निर्मीती केली त्यांना आजपर्यंत एकही विश्वचषक जिंकता आला नाही. हे किती दुर्भाग्यपूर्ण आहे. ‘

यावर त्यावेळी पीयर्सने कोणतेही उत्तर दिले नव्हते. त्याने संधीची वाट पाहिली, आणि इंग्लंडने जेतेपद मिळवल्यानंतर पुन्हा एकदा सेहवागला डिवचले आहे.

इंग्लंडच्या विजयानंतर पीयर्सने तीन वर्षापूर्वीचा भारतीय वर्तमान पत्राचा फोटो पोस्ट करत आणि सेहवागला टॅग करत ‘हाय मेट’ असा मेसेज लिहिला आहे. विरेंद्र सेहवागने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण सेहवागचा हजरजबाबीपणा पाहता सेहवाग पीयर्सला भन्नाट उत्तर देईल, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 2:06 pm

Web Title: piers morgan and virender sehwag twitter clash on world cup 2019 final nck 90
Next Stories
1 ‘कोणीतरी जाऊन धोनीशी चर्चा करायला हवी’
2 ‘माझे चार ते पाच महिलांशी विवाहबाह्य संबंध होते’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा खुलासा
3 रोहित-विराट वादाच्या चर्चांवर संघ व्यवस्थापनाने सोडलं मौन
Just Now!
X