News Flash

शंभराव्या कसोटीसाठी केव्हिन पीटरसन तयार

मैदानावर आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध इंग्लंडचा केव्हिन पीटरसन मैदानाबाहेर विविध कारणांसाठी चर्चेत असतो.

| November 20, 2013 03:26 am

शंभराव्या कसोटीसाठी केव्हिन पीटरसन तयार

मैदानावर आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध इंग्लंडचा केव्हिन पीटरसन मैदानाबाहेर विविध कारणांसाठी चर्चेत असतो. अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी पीटरसनला लक्ष्य केले आहे. मात्र या कशानेही व्यथित न होता शंभरावी आणि ऐतिहासिक कसोटी खेळण्यासाठी एकदम तय्यार असल्याचे पीटरसनने म्हटले आहे. या मालिकेसाठी मिळणाऱ्या वृत्तांकनाबाबत मी समाधानी आहे. माझा आत्मविश्वास उंचावला आहे पण याचे रुपांतर अहंकारात व्हायला नको. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या आणि इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाला संघर्षांचा सामना करावा लागतो. परंतु मी खेळावर लक्ष केंद्रित करेन. केव्हिन पीटरसनने ९९ कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधित्त्व केले असून ब्रिस्बेन कसोटी त्याची शंभरावी असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2013 3:26 am

Web Title: pietersen ready for his century in test cricket
टॅग : Kevin Pietersen
Next Stories
1 भ्रष्टाचाराचा खटला मागे घेण्याची आर्मस्ट्राँगची विनंती
2 आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैत्रीपूर्ण सामना : भारताची नेपाळवर मात
3 भ्रष्टाचारप्रकरणी चॅपेल यांची आयसीसीवर टीका
Just Now!
X