ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान होणारी कसोटी मालिका दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. या मालिकेदरम्यान डीआरएस अर्थात पंच ुनिर्णय पुनर्आढावा पद्धती अंगीकारण्यात येणार आहे. गुलाबी चेंडूच्या वापरासह या पद्धतीची चाचणी घेण्यात आली. ऑस्ट्रेलियातील शेफील्ड स्पर्धेच्या सामन्यादरम्यान गुलाबी चेंडू वापरात असताना पंच पुनर्आढावा पद्धती वापरण्यात आली. चेंडूची वाटचाल दर्शवणाऱ्या इगल बॉल ट्रॅकर पद्धती न्यूझीलंडमधील अ‍ॅनिमेशन रिसर्च कंपनीने विकसित केली आहे. न्यूझीलंडमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीदरम्यान गुलाबी रंगामुळे तंत्रज्ञानाला चेंडूचा प्रवास टिपण्यात अडचण निर्माण झाली होती. यामुळे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मालिकेदरम्यान या पद्धतीच्या वापरावर प्रश्चचिन्ह निर्माण झाले होते. मात्र ऑस्ट्रेलियातील गवताचा रंग आणि स्वरुप योग्य राखले असल्याने तंत्रज्ञानाने गुलाबी चेंडूचा प्रवास योग्य तऱ्हेने रेखाटला असा दावा कंपनीने केला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी ५ नोव्हेंबरपासून ब्रिस्बेन येथे सुरु होत आहे.