27 November 2020

News Flash

IPL 2019 : विस्फोटक खेळीनंतर पोलार्डचं पत्नीला वाढदिवसाचे भन्नाट गिफ्ट

सामन्यानंतर पोलार्डच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईने पंजाबचा तीन विकेटनं पराभव केला. या विजयात कायरान पोलार्डने कर्णधाराला साजेशी विस्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलार्डनं हा विजय पत्नीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून समर्पित केला. सामन्यानंतर पोलार्डच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

पंजाबविरोधात पोलार्डने ३१ चेंडूत दहा षटकारांसह ८३ धावांची स्फोटक खेळी केली. काल बुधवारी पोलार्डच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्याच दिवशी पोलार्डनं स्फोटक खेळी केली. पण पत्नी सामना पाहण्यासाठी उपस्थित नव्हती. अशातच पोलार्डनं विजय मिळवत पत्नीला विजयाचे भन्नाट गिफ्ट दिले आहे. सामन्यानंतर मुलासोबत बोलताना पोलार्डनं याचा खुलासा केला. पोलार्डची पत्नी जीना गर्भवती असल्यामुळे सामना पाहण्यासाठी भारतात आलेली नाही. पोलार्डने सामना सुरू होण्यापूर्वी इन्स्टाग्रामवरून पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

पोलार्ड आणि जीना यांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते.  त्यांना दोन आपत्य आहेत. मुलगा सध्या वडिलांसोबत भारतामध्ये आयपीएल सामन्याचा आनंद घेत आहे. तर पत्नीसोबत मुलगी आहे. पत्नी जीवा तिसऱ्यांदा गर्भवती राहिली आहे.

दरम्यान, कर्णधार कायरन पोलार्डच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 3 गडी राखून मात केली. पंजाबचं 198 धावांचं आव्हान मुंबईने कायरन पोलार्डच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या इतर फलंदाजांनी चांगलीच निराशा केली, मात्र कायरन पोलार्डने एक बाजू लावून धरत कर्णधाराला साजेशी खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 12:36 pm

Web Title: pl 2019 mi vs kxip kieron pollard dedicate his innings to his wife
टॅग IPL 2019
Next Stories
1 महिला कार रॅली : दीपा, प्रियांका यांना विजेतेपद
2 राजस्थानची चेन्नईसमोर अग्निपरीक्षा!
3 हरभजन आणि ताहिर मुरलेल्या वाइनसारखे -धोनी
Just Now!
X