आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फिफा) बुधवारी ९० दिवसांचे निलंबन रद्द व्हावे, यासाठी फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लाटर आणि युरोपियन फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख मिचेल प्लॅटिनी यांनी केलेली याचिका फेटाळली. फिफाच्या या निर्णयामुळे फिफाचे अध्यक्ष बनण्याच्या प्लॅटिनी यांच्या मनसुब्याला जबर धक्का बसला आहे. फेब्रुवारी २०१६मध्ये होणाऱ्या निवडणुकीत प्लॅटिनी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.