X
X

ताहिरसमोर जपून खेळा

READ IN APP

या मालिकेमध्ये त्याचा सामना भारतीय खेळाडूंना करावा लागणार आहे

सचिन तेंडुलकरचा भारतीय संघाला सल्ला

आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये फिरकीपटू इम्रान ताहिरसमोर जपून खेळा, असा भारतीय संघाला माजी मास्टर-ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने दिला आहे.
‘‘ ताहिर हा एक दर्जेदार फिरकीपटू आहे. या मालिकेमध्ये त्याचा सामना भारतीय खेळाडूंना करावा लागणार आहे. तो एक आघाडीचा गोलंदाज असून त्याच्याविरुद्ध खेळताना काळजी घ्या,’’ असे सचिन म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार असून यामध्ये तीन ट्वेन्टी-२०, पाच एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेला महात्मा गांधी-नेल्सन मंडेला हे नाव देण्यात आले आहे.
भारतीय संघाबद्दल बोलताना सचिन म्हणाला की, ‘‘सध्याचा भारतीय संघ उत्तम आहे, त्यांच्यामध्ये चांगली गुणवत्ता आहे. मला माहिती आहे की, खेळाडूबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत. पण जेव्हा या गोष्टी येतात तेव्हा त्यांच्यासाठी कोणतेही सोपे मार्ग नसतात. मला माहिती आहे की, हे खेळाडू समर्पित असून हा एक चांगला संघ आहे.’’
तो पुढे म्हणाला की, ‘‘ या मालिकेतील ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामने चांगलेच रंगतदार होती, पण माझे लक्ष कसोटी क्रिकेटवर असेल. कारण दोन्ही संघांकडे चांगला दर्जा आणि गुणवत्ता असून दोन्ही संघ चांगलेच समतोल आहेत.’’

21
X