News Flash

मैदानी खेळ खेळा आणि समाजमाध्यमांपासून दूर राहा!

विराट कोहलीचा युवकांना सल्ला

| November 10, 2017 02:38 am

मैदानी खेळ खेळा आणि समाजमाध्यमांपासून दूर राहा!
भारताचा संघनायक विराट कोहली

विराट कोहलीचा युवकांना सल्ला

मैदानी खेळ खेळा आणि समाजमाध्यमांवर बराच वेळ वाया घालवू नका, असा सल्ला प्रेरणादायी तंदुरुस्ती आणि कौशल्यपूर्ण खेळासाठी विशेष ओळखला जाणारा भारताचा संघनायक विराट कोहलीने गुरुवारी युवकांना दिला.

‘‘सध्या मुले मैदानी खेळांपेक्षा व्हिडीओ गेम्स अधिक प्रमाणात खेळतात. शारीरिक तंदुरुस्ती ही अतिशय महत्त्वाची असते. हा माझा संदेश फक्त युवकांसाठी नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाला आहे,’’ असे कोहलीने एका कार्यक्रमात सांगितले.

समाजमाध्यमांपासून दूर राहण्याबाबत युवकांना मार्गदर्शन करताना कोहली म्हणाला, ‘‘सध्या युवा मंडळी सर्वत्र काय घडते आहे, याचा आढावा घेण्यासाठी दिवसातील बराचसा वेळ समाजमाध्यमांवर घालवतात. हा वेळ मर्यादित ठेवायला हवा. वाचलेला हाच वेळ मग उपयुक्त ठरेल.’’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 2:36 am

Web Title: play outdoor sport virat kohli
Next Stories
1 माझ्या प्रत्येक पदकामागे संघर्षाची कहाणी दडली आहे : मेरी कोम
2 सचिनने दिला रणजी सामन्यातील जुन्या आठवणींना उजाळा
3 चार षटकांत त्याने अख्खा संघ केला गारद; टी-२० त नवा विश्वविक्रम
Just Now!
X