11 August 2020

News Flash

खुल जा सीम सीम..

आयपीएलच्या धर्तीवर ‘प्रो-कबड्डी’ लीगचा नवा फंडा लवकरच क्रीडारसिकांचे लक्ष वेधण्यासाठी येत आहे. ‘खुल जा सीम सीम’चा नारा देत कबड्डीपटूंना आर्थिक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या

| May 20, 2014 12:50 pm

आयपीएलच्या धर्तीवर ‘प्रो-कबड्डी’ लीगचा नवा फंडा लवकरच क्रीडारसिकांचे लक्ष वेधण्यासाठी येत आहे. ‘खुल जा सीम सीम’चा नारा देत कबड्डीपटूंना आर्थिक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या स्पध्रेच्या निमित्ताने होणार आहे. आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पध्रेत प्रत्येक संघात १२ खेळाडूंचा समावेश असेल. या लिलावामध्ये सुमारे १४ देशांच्या ९६ खेळाडूंवर बोली लागणार आहे.
कबड्डी प्रीमियर लीगच्या (केपीएल) अपयशानंतर ‘प्रो-कबड्डी’ या नव्या नावानिशी मशाल स्पोर्ट्स आणि भारतीय हौशी कबड्डी महासंघाने हे शिवधनुष्य उचलले आहे. या स्पध्रेसाठी सहा संघांनी नावे धारण केली आहेत, तर पाटणा आणि दिल्लीचे नावे अद्याप ठरलेली नाहीत. या लिलावामधील ९६ खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार अ, ब आणि क अशा तीन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघाला ‘अ’ आणि ‘ब’ गटातील खेळाडू खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ६० लाख रुपये उपलब्ध असतील. ‘अ’ आणि ‘ब’ गटातील खेळाडूंसाठी अनुक्रमे ४ लाख आणि २ लाख रुपये पायाभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. ‘क’ गटातील खेळाडू दुहेरी ड्रॉ पद्धतीने संघांना देण्यात येतील. प्रत्येक संघातील १२वा आणि अखेरचा खेळाडू फ्रेंचायझी ‘राज्याचा वाइल्ड कार्डप्राप्त’ खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवेल. यासाठी संबंधित संघटनांकडून युवा खेळाडूंच्या याद्या मागवण्यात आल्या आहेत.

प्रो-कबड्डीमधील सहभागी संघ
शहर                       संघांची नावे    
बंगळुरू                   बंगळुरू बुल्स
जयपूर                  जयपूर पिंक पँथर्स
कोलकाता              बंगाल वॉरियर्स
पुणे                        पुणेरी पलटण
विशाखापट्टणम्    तेलुगू टायटन्स
मुंबई                     यू मुंबा    
पाटणा                  ठरले नाही
दिल्ली                   ठरले नाही

संघ : ८ (प्रत्येक संघात १२ खेळाडू)
लिलावासाठी उपलब्ध खेळाडू : ९६
‘अ’ आणि ‘ब’ गटातील खेळाडूंच्या खरेदीसाठी उपलब्ध रक्कम : ६० लाख रुपये
‘अ’ गटातील खेळाडूची पायाभूत किंमत : ४ लाख रुपये
‘ब’ गटातील खेळाडूची पायाभूत किंमत : २ लाख रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2014 12:50 pm

Web Title: players auction for pro kabaddi set to be held tuesday
Next Stories
1 न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडून ब्रेंडन मॅक्क्युलमची पाठराखण
2 भारतीय हॉकीपटूंमध्ये सातत्याचा अभाव -डायर
3 महान एफ-वनपटू सर जॅक ब्राभम यांचे निधन
Just Now!
X