डेविड मलानच्या ९९ धावांच्या नाबाद खेळीच्या बळावर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडनं तीन टी-२० सामन्याची मालिका ३-० ने जिंकली आहे. ९९ धावांच्या विजयी खेळीमुळे मलानला सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं. टी-२० क्रिकेटमध्ये ९९ धावांची खेळी करणारा मलान तिसरा इंग्लंडचा खेळाडू ठरला आहे.

टी-२० मध्ये आतापर्यंत ९९ धावांची खेळी करणारे तिन्हीही फलंदाज इंग्लंडचे आहेत. २०१२ मध्ये अॅलेक्स हेल्सनं विडिंजविरोधात ९९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर २०१२ मध्येच ल्यूक राइटनं अफगाणिस्तान विरोधात नाबाद ९९ धावांची खेळी केली होती. आता २०२० मध्ये डेविड मिलन यानं दक्षिण आफ्रिकेविरोधात नाबाद ९९ धावांची विजयी खेळी केली. टी-२० क्रिकेटमध्ये ९९ धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये तिन्हीही खेळाडू इंग्लंडचेच आहेत. एकदिवसीय सामन्यात ९९ धावांवर बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरोधातील तीन टी-२० सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीमुळे इंग्लंडच्या डेविड मिलन याला मालिकाविर पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं आहे. मिलनं तिसऱ्या सामन्यात बटलरसोबत दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १६७ धावांची भागिदारी केली.